मनमंदिरा तेजाने ........


- © अमृता कुलकर्णी

पहाटेची ती निरव शांतता.. कधी उगवतीची वेळ..पक्षांचा किलबिलाट... हलकीच आकाशाच्या अंगणात होणारी पिवळ्या आणि केशरी रंगांची उधळण…. एखा्दया पहाटेच्या वेळी कानावर पडलेली काकड आरती.. मंदिरात गेल्यावर होणारा घंटानाद…. हलकं सुमधुर संगीत….कुठल्याही मंगलकार्याच्या वेळी ऐकू येणारे सनईचे मंगल स्वर….मंत्रांचा नाद घोष ….. मनाला प्रफुल्लीत करणारी हि ‘Positivity’, रातराणीच्या वासासारखी कितीतरी वेळ मनात दरवळत राहते. 

आपलं मन हे सतत कोणत्या ना कोणत्या विचारात गुंतलेलं असतं, असा एकही क्षण नसतो कि ज्यावेळी आपल्या मनात विचार येत नाही आणि म्हणून जेंव्हा कधीही आपण घराबाहेर पडतो, त्यावेळेस आपल्याला एक चेंज हवा असतो, तेंव्हा हि Positivity ची बाह्य रूपं आपल्या मनात खोलवर रुजतात.आपल्याही आत कुठेतरी दडलेल्या सकारत्मकतेचं भान आपल्याला नसतं. लहानपणी आपलं मन हे खूप शुद्ध , निरागस, निर्मळ असतं पण जसे आपण लहानाचे मोठे होतो तेंव्हा नकळतपणे आपण विचारांमध्ये अडकत जातो. Most of the time हे विचार negative असतात. ह्या निगेटिव्हिटीला आपण इतकी एम्पॉवरमेंट दिलेली असते कि positivity आपण फक्त बाह्य स्वरूपातच शोधतो, स्वतःमध्ये नाही. स्वतःमध्ये दडलेल्या positivity ची कितीतरी उदाहरणं लहानमोठ्या गोष्टीतून आपल्याला अनुभवायला मिळतात. कितीतरी वेळा लहान-मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, त्या प्रयत्नांच फळं मिळणार….हे वाटणं म्हणजे आपल्यातला positivity चं उदाहरण आहे. निराशेच्या गर्तेत एखाद्या क्षणाला आपल्या पाठीवरून मायेने एखादा हात फिरतो, तेव्हा जी जाणीव होते ती म्हणजे Positivity... 

माझ्या दृष्टीनं, मनाच्या गाभाऱ्यात तेवत असलेल्या समईचा प्रकाश हाच या Positivity चा मतितार्थ, ज्याचं अस्तित्व तर असतं पण आपल्याला फक्त त्याची जाणिव नसते. पण कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या मागे वाईट गोष्ट, आनंदाच्या मागे दुःख हे समीकरण नेहमीच ठरलेलं असतं , त्यामुळेच भीती , काळजी , अस्थिरता किंवा मानसिक धक्का या गोष्टींमधून आपण कमी नाही तर जास्तच negativity अनुभवतो . 

आपल्या आयुष्यात अस्थिरता फार पटकन येते, पुष्कळ वेळा ही अस्थिरता आणि अनुषंगाने येणारी Negativity ही social media,print media, electronic media अथवा एखाद्या अनपेक्षित घटनेतून येते.अगदी सहज, सुरळीत सुरू असलेल आपलं आयुष्य क्षणार्धात अस्थिर करते...या गोष्टी आपल्याला 100% टाळता येणं शक्य नाहीये पण त्यांच्या वर कंट्रोल मिळवणं नक्कीच शक्य आहे. हि येणारी अस्थिरता, मुळातच का आणि कशामुळे येते याचा जर मागोवा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल कि याचं एक मुख्य कारण म्हणजे technology वर वाढत असलेली आपली dependency. अर्थातच Physical efforts पेक्षा smart work कधीही सरस असतं हा विचार कुठेतरी रुळायला लागला आहे . पण त्यामुळे technology advancement चा हा फंडा आजच्या generation मधून प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची मानसिकता कमकुवत करत चालला आहे. 

आजकाल गरजेच्या गोष्टी मिळवण्यासाठी पूर्वी इतका struggle राहिला नाहीये. आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी आणि गरजा बऱ्याचदा वेळेच्या अगोदर पूर्ण होतात .आणि त्या मुळेच की काय एखादी गोष्ट मिळवण्या साठीचा struggle काय असतो, त्या साठी वेळेची किती किंमत मोजावी लागते या गोष्टींपासून आजची generation दुरावत चालली आहे, या मध्ये अजून काहीशी भर म्हणजे कष्टाला shortcut keys पण मार्केट मध्ये available आहेत . त्यामुळेच जेंव्हा कमी कष्टात आनंद पटकन मिळतो तेंव्हा त्या गोष्टींचे तोटेही सहन करावे लागतात . 
Technology च्या dependency मुळे, गोष्टी न मिळाल्यावर मनावरचा सुटणारा ताबा हा निराशा, depression, suicide attempt, आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही की आपलं जगणं शून्य झालंय ....... या सारख्या घातक विचारांना अगदी नकळत पणे जवळचं करतो.

 विचार हे सतत positive रहात नाहीत , बऱ्याचदा या positivity ला आपल्यापर्यंत खेचून आणावं लागतं. आयुष्यात गोष्टी या बुध्दीबळाच्या पटासारख्या असतात , जेव्हा तुम्ही काळ्या घरामधे उभे असता तेव्हा तुम्हाला या positivity चा पाठपुरावा करावा लागतो. ही positivity बहुतांशी बाह्य गोष्टीतूनच मिळवावी लागते. सकारात्मकता अंगीभूत करण्यासाठी तिचा ध्यास धरावा लागतो, तेव्हाच वाईटामध्येही चांगल्याचा प्रभाव दिसून येतो, कुठल्या ही मानसिक त्रासातून ,आघातातून लवकर बाहेर पडता येतं . वेळेची, पैशाची, कष्टाची किंमत ही कायम मनाच्या कणखरतेमुळे, जिद्दीने, मनातल्या आशेने मिळते, हि जीवनमूल्य ज्या वेळेस नेगेटिव्हिटी वर विजय मिळवतात तेंव्हा त्यांचं महत्व प्रकर्षानं जाणवतं. 

मनाचा संयम आणि धीर हा कष्टातून अनुभवायला मिळतो, कुठलीही technology मनाच्या या गुणांना next level वर नेण्यासाठी अजून तरी अस्तित्वात आली नाहीये.पूर्वी लोकांकडे technology नव्हती. जवळच्या माणसाची खुशाली समजण्या साठी महिन्याभरानं येणारं पत्र वेळेचा संयम शिकवत होते तर आशावाद, जिद्द, छोट्याश्या गोष्टीतही समाधान मानणारी , पैशाचा नियोजनपूर्वक वापर करणारी, basic गरजांसाठी आयुष्य वेचणारी पूर्वीची पिढी आजही हि एका आदर्श मार्गदर्शकाचं काम बजावते. 

उन - पावसा सारखा पाठशिवणीचा खेळ खेळणारी positivity आणि negativity असते. उन्हा सारखी स्वच्छ , सुंदर, पारदर्शक प्रकाशा सारखी असणारी positivity निराशेच्या,अस्थिरते च्या,भीतीच्या,काळजीच्या काळ्या ढगांना फारसं कधीच टिकू देत नाही. ही positivity आपल्या जगण्याचा भाग होण्यासाठी, सातत्याने चांगल्या-वाईट आचार-विचारांचं मूल्यमापन करावं लागतं. महाराष्ट्राला लाभलेली संत वाड्मयाची शिदोरी ह्याच जीवनमूल्यांची पायाभरणी करतात. श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्र्लोका मधून सांगितलेली मानवी आयुष्याची कर्तव्य मूल्य, श्री स्वामी समर्थांनी सांगितलेली निर्भयता आणि निःशंकता, श्री साई बाबा यांनी सांगितलेली श्रद्धा , सबुरी आणि नितांत प्रेम हे या positivity चे मूलाधार आहेत. हे मूलाधार आत्मसात करण्यासाठी संत वाड्मयाला हसत खेळत आपलसं करणं हाच एक उत्तम उपाय आहे. पुरोगामी विचारांच्या लोकांना ही गोष्ट कितपत रुचेल माहीत नाही पण experiment करून experience करायला काही हरकत नसावी, नाही का? मला असं वाटतं, हे संत वाड्मय आजच्या काळातला management गुरु आहे, या गोष्टींना दूसरीकडे शोधण्याची गरज नाही.आपल्या सुदैवाने या तत्वांना समजण्यासाठी या महारथीनी अनुभवाची पण जोड दिलेली आहे..तुमची दिशा हि तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे, आणि म्हणूनच समर्थांनी म्हंटलेलं आहे - 

मना त्वांचि रे पूर्वसंचित केले | 
तयासारिखे भोगणें प्राप्त झाले || 

#Positivity #Negativity #Socialmedia #Chaneginself #Management #Mindstrength

Comments

  1. well said, need to imbibe in our children.

    ReplyDelete
  2. Well said..beautifully described..keep it up Amruta..

    ReplyDelete
  3. Beautifully articulated... Perhaps people know the cause of negativity however do not want to get out of it...

    ReplyDelete

Post a Comment