Posts

स्वामिनी

  -  ©   अमृता कुलकर्णी   8 मार्च , जागतिक महिला दिन .. International Women's Day. दरवर्षी   येणारा हा दिवस . तुम्हाला काय वाटतं ? काय खास असतं या दिवशी की म्हणून हा दिवस celebrate करावा ?  ज्या कारणासाठी हा दिवस मुळातच celebrate केला जातो , त्या साठीचा हा   मान सन्मान एका दिवसा पुरता मर्यादित आहे काआणि तो एकच दिवस पुरेसा आहे ?   एक स्त्री म्हणून मला पडलेले हे   बरेच प्रश्न . आजही  समाजात असे अनेक घटक आहेत  की   ज्यांचं   सबलीकरण, सर्वांगीण विकास होणं  हे  अत्यंत  गरजेचं  आहे. तिथे  समाजाच्या  एकाच  घटकावर  खूप  अन्याय होतोय  हे  दाखवून  चालत  नाही. आपल्या कुटुंबसंस्थे मध्ये  स्त्रीला महत्वाच  स्थान असल्याने  महिला सबलीकरण , सशक्तीकरण    तिच्या साठी  काही  बाबततीत    करणं  हे अत्यावश्यक  होतं.   जी स्त्री   खूप हाल अपेष्टा सहन करते , परिस्थिती   पुढे हतबल आहे , जिला बळकट करून खऱ्या अर्थाने तिच्या कुटुंबाचं हित आहे अश्या त्या प्रत्येक   स्त्री साठी   हे करणं अत्यंत गरजेचं आणि हितकारकच आहे .  पण  एक स्त्री   म्हण