स्वामिनी

 

© अमृता कुलकर्णी 

8 मार्च, जागतिक महिला दिन.. International Women's Day. दरवर्षी  येणारा हा दिवस. तुम्हाला काय वाटतं ? काय खास असतं या दिवशी की म्हणून हा दिवस celebrate करावाज्या कारणासाठी हा दिवस मुळातच celebrate केला जातो, त्या साठीचा हा  मानसन्मान एका दिवसा पुरता मर्यादित आहे काआणि तो एकच दिवस पुरेसा आहे?

 एक स्त्री म्हणून मला पडलेले हे बरेच प्रश्न. आजही  समाजात असे अनेक घटक आहेत  की   ज्यांचं   सबलीकरण, सर्वांगीण विकास होणं  हे  अत्यंत  गरजेचं  आहे. तिथे  समाजाच्या  एकाच  घटकावर  खूप  अन्याय होतोय  हे  दाखवून  चालत  नाही. आपल्या कुटुंबसंस्थे मध्ये  स्त्रीला महत्वाच  स्थान असल्याने महिला सबलीकरण,सशक्तीकरण  तिच्या साठी काही  बाबततीत    करणं  हे अत्यावश्यक  होतं.  जी स्त्री  खूप हाल अपेष्टा सहन करते, परिस्थिती  पुढे हतबल आहे, जिला बळकट करून खऱ्या अर्थाने तिच्या कुटुंबाचं हित आहे अश्या त्या प्रत्येक  स्त्री साठी  हे करणं अत्यंत गरजेचं आणि हितकारकच आहे.  पण एक स्त्री  म्हणून माझे काही  वैयक्तिक विचार आहे.ते तुम्हाला पटावे असा माझा जराही  आग्रह नाही आणि सक्ती तर मुळीच नाही पण जरा काही  सांगावस वाटतंय इतकंच.

महिला दिन म्हंटला की ती किती great आहे, ती किती मोठी आहे, तिला किती तरी गोष्टी compromise कराव्या लागतात  या वर दिवसभर चर्चा, प्रोग्राम, सार्वजनिक व्याख्यानं असं बरंच काही  चालतं. अश्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये  तिला सतत  त्रास होतो  आणि तिला  एकटीलाच हे करावं  लागतं. अश्या प्रकारचा मुद्दा अधोरेखित  होतो पण हे १००% खरं असतं असं   म्हणता  येत  नाही.प्रत्येक  व्यक्ती  साठी  परिस्थिती  वेगळी  असते  आणि त्या  नुसार  त्या व्यक्तीला  निर्णय  घ्यावे  लागतात  असं  मला  वाटतं.   त्यामुळे  या अशा कार्यक्रमाच्या  संकल्पनेशी  मी फारशी सहमत  नसते , त्यातून या  प्रकारच्या कार्यक्रमात  जे व्याख्याते  किंवा जे व वक्ते असतात  ते खरंच  स्वतः  इतकं  balnaced  वागतात का असाही  प्रश्न मला बरेचदा  पडतो.   

निसर्गाने  नर- मादी ही प्रजाती प्रत्येक प्राण्या मध्ये अस्तित्वात आणलिये,याला मनुष्यजातही अपवाद नाही आणि या नियमानुसार स्त्री  मध्ये काही वेगळेपण ही तिला बहाल केलय. तिचं सौंदर्य, तिचं चंचल, अनाकलनीय मन, तिची  संवेदनशीलता,वेळ प्रसंगी कणखरपणा, त्याग, मातृत्व, समजूतदारपणा multi tasking,आर्थिक जबाबदारी पेलणं, हळवेपणा आणि बरंच काही जे  शब्दात मांडण्याच्या पलीकडे असतं. ह्या प्रत्येक गुणाचा वापर वेळ प्रसंग नुसार करणं हे ही तिला अवगत असतं. मग तरीही हे सगळं  माहीत असून अश्या कुठल्या कारणासाठी हा दिवस celebrate केला जातो? या प्रश्नाचं  माझ्या कडे असलेली उत्तरं म्हणजे,आपण तिला गृहीत धरतो हे एक ,तिची स्वतःची काही जागा आहे  याचा  विसर पडतो हे दुसरं, या दोन गोष्टी  फक्त पुरुष वर्गा कडून होतात असं नाही या मध्ये घरातली मुलं, ज्येष्ठसमवयस्क इतर नातेवाईक आणि  तिचे मित्र मैत्रिणी यांचाही contribution असतं.

महिला दिवस, हा फक्त पुरुषाने किंवा समाजानं तिच्या वर केलेले अत्याचार किती  गंभीर आहे हे दाखवण्याचा नसून एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री ला  दिलेला सन्मान सुद्धा अधोरेखित करण्याचा आहे कारण तिच्या साठी नात्यांचे कांगोरे  असंख्य आहेत. या प्रत्येक नात्यामधून ,तिच्यासाठी  तिने  त्या नात्यांची  विण किती घट्ट बांधलेली आहे त्यावर  त्या  नात्याची  देवाण घेवाण  अवलंबून असते .नात्यामध्ये तिने समर्पण दिलही असेल आणि देत सुद्धा असते पण  मिळणारे रिटर्न हे तिच्या  अपेक्षे प्रमाणे असतील अस नाही. ते वेगळ्या पद्धतीत मिळू शकतात  पण ते स्विकारण्यासाठी  तिचा  ओपन ॲप्रोच  असायला हवा

हळवेपणा आणि संवेदनशीलता  हे दोन गुण   तिला  निसर्गतः  भरभरून  दिलेले असल्याने  बऱ्याचदा ती  भावनेतच गुरफटून जाते, त्यामुळे आपल्या अवतीभवती जे लोक आपल्या चांगल्या साठी सांगतात, ते समजून  घेण्यात ती कायम मागे पडते. माझ्या दृष्टीने आपल्याला त्रास खूप होतो हे सांगत बसण्यापेक्षा आपण flexible होण्यासाठी काय अजून करू शकतो ह्यावर अधिक भर देण हे जास्त महत्त्वाचं आहे कारण कुठलाही माणूस perfect नसतो. Adjustment  ही प्रत्येकाला करायची असते. मग आपल्या वर  प्रत्येक गोष्टीचा ताण घेण्या पेक्षा , गोष्टी  सहज, सोप्प्या कश्या होतील याचा विचार तिने नक्कीच करायला हवा. आपल्या  भावना मोकळेपणाने मांडायला हव्या , आपल्या प्रश्नावर आपल्या फॅमेलीत चर्चा  करायला हवी.

आजकालची स्त्री ही multi tasking करते. स्वतःचं  independence आर्थिक दृष्ट्या  सांभाळते पण हे करत असताना तिच्या साठी  फ्रस्ट्रेशन येणं ही गोष्ट  नवी नाही.मग ती स्त्री विवाहित असो, अविवाहित असो, सिंगल mother असो किंवा इतर कुठलीही.   घरात पडणाऱ्या कामाचा अंदाज तिने घरात दिला  पाहिजे आणि त्या नुसार  घरातल्या प्रत्यके व्यक्तीला  ( अगदी लहान मुला पासून ते नवरा, घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती पर्यंत)  मानसिक रित्या सक्षम केलं पाहिजे तरच तिच्या साठी कितीतरी अवघड गोष्टी सोप्प्या होतील पण या मध्ये इतर व्यक्तीचा समंजसपणा सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो. कुठल्याही पडणाऱ्या कामाची जवाबदारी घरातल्या प्रत्येकाची आहे  हे कुटुंबातील  प्रत्येकाने समजून  ते काम करायला  हवं. तिला support करणं आणि  तिचा   सन्मान करणं कदाचित यांपेक्षा काही  वेगळं असूच शकत नाही.   

सगळ्याच गोष्टी सांभाळायच्या आणि करायच्या म्हणल्या की तडजोड ही अनुषंगाने आलीच आणि हे स्वीकारता येणंही तितकंच महत्त्वाचं असतं. मीच का करायचं? हे करण्या पेक्षा काही वेळेला गोष्टी सोडून देण्यात जास्त maturity असते. आपल्याला जे जमतंय , जसं जमतंय ते चांगलं  आहे हे इतरांपेक्षा स्वतःला  तिने समजावण्याची जास्त गरज आहे आणि हेच पुष्कळदा  ती स्वतःला समजवण्यात कमी पडते. सगळयाच गोष्टी  हव्या तश्या आणि तितक्याच perfectionमध्ये करता येत नाही. मग यामध्ये  ती स्वतःला त्रागा तर करून  घेतेच पण कुठेतरी आत कुढत राहते की ती ते करू शकली नाही. सगळ्याच गोष्टींचा अट्टाहास करून काहीच हाती   येण्या पेक्षा जे हातात आहे त्याला १००% देवून  त्या मधला आनंद तर ती नक्कीच उपभोगू शकते.

माझा स्त्री आणि पुरुष यांच्यात असमानता असते या  वर विश्वास नाही. आपल्या काय काम येत आणि काय काम   येत नाही या वर प्रत्येक स्त्रीचा आणि पुरुषाचा  एक पिंड  ठरलेला असतो आणि मुळात तुमची जडणघडण , तुमचे  स्वतःचे विचार, अनुवंशिकता हे सगळे गुण तुम्ही काय करू शकता , काय नाही हे ठरवत असतात. त्यामुळे इथे स्त्री श्रेष्ठ की पुरुष हा मुद्दा माझ्या दृष्टीने गौण आहे. ते एकाच  नाण्याच्या दोन बाजू आहेत.

हो पण , तिला गृहीत धरण, तिच्या  विचारांना स्थान देणं,   तिच्या  प्रामाणिकपणा चा गैरफायदा घेणं, विश्वासघात करण ,तिच्या  तडजोडीचा  अव्हेर करण अशा काही गोष्टी तिच्या मनाला आयुष्यभर जखमा देतात आणि त्या भरून काढण्याच्या पलीकडे असतात. मग हे तिच्या जवळच्या कुठल्याही पुरुषाने अथवा स्त्री ने केलं तर तो गुन्हा तिच्या साठी सदैव अक्षम्य असतो.

तिचं सौंदर्य हे सुध्दा या गोष्टीला अपवाद नाहीमनोरंनक्षेत्र, राजकीय, आर्थिक व्यवहार आणि इतर कुठलंही क्षेत्र असो  तिला इथे  बऱ्याचदा  प्रामाणिकपणाच्या अग्नी परीक्षेतून  जावं लागतं आणि बहुतांशी तिला  या परिक्षेत नापासाच व्हावं लागतं. त्यातून बलात्कार या सारख्या  जेव्हा गोष्टी होतात तेव्हा  तिचं आयुष्य मात्र क्षणार्धात उध्वस्त होत. कोणाच्या तरी वासनेच्या अतिलालासेतून तिच्या उध्वस्त झालेल्या आयुष्याची परतफेड कोणीही करू शकत नाही. एकतर्फी प्रेमातून  acid फेकून तिच्या चेहऱ्याच विद्रुपीकरण  करण्याच् कृत्य अती कठोर शिक्षेला पात्र आहे.

तिच्या जवळ असलेल्या सौंदर्याची  तिने  प्रत्येक  वेळी  किंमत  चुकती  करायला  हवी  असं  नाही  .तिच्या सौंदर्याचा सुद्धा मान सन्मान करता आला पाहिजे ही विचारसरणी प्रत्यकाने अंगीभूत करायला हवी.तरच स्वामिनी म्हणून  तिच्या असण्याचा, तिच्या सौंदर्याचा, तिच्या विचारांचा ,तिच्या  अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा  आदर केला असा म्हणता येईल.

महिला दिवस हा माझ्या साठी असमानता दिन नसून , प्रत्येक वर्षी या दिवशी  स्वतःला  आनंदी, उत्साही, balanced आणि जास्तीत जास्त सकारात्मक  कसं ठेवता येईल या वर केंद्रित असावं सं माझा व्यक्तिगत मत आहे. स्वामिनी  म्हणून  ती  आनंदी  उत्साही  मनमोकळी    जेव्हा  दिसेल  तेव्हा  स्वर्गातल्या  अप्सरेला सुद्धा स्वतः च्या सौंदर्याची लाज वाटेल हे नक्की  तुमचंही मत सं काहीसं  आहे का?


#InternationalWomen'sDay #8March2021 #WomenEmpowerment

Comments

  1. So thoughtful, deep and apt.

    ReplyDelete
  2. Very nice Amruta khup chhan....agdi sagali baju neet mandli ahe. Jasa gharatlya pratekachya yasha sathi Ti tadjod karte ani pathishi ubhi rahate...tasach jar gharche thodi tadjod karun tichya pathishi ubhe rahilet tar ticha yash hey nischhit ahe. Gharche thode swavalambi jari zale tari tichya sathi hey khup ahe.

    ReplyDelete

Post a Comment