सेलिब्रिटी



- © अमृता कुलकर्णी

सेलिब्रिटी...अहं .... थांबा जरा .... हे ते नाही, जे तुम्हाला वाटलं. काळाची चक्र मागे फिरवून आपल्या सोयीने जर एखादी गोष्ट निवडायची ठरवली तर आपण आपलं लहानपण नक्कीच मागू यात काही शंका नाही ....आता क्षणभर जरा डोळे  मिटा, थोड फ्लॅशबॅक मध्ये म्हणजे लहानपणात जा...आणि ती व्यक्ती डोळ्यासमोर आणा की जिला आजही आठवल्या नंतर, आनंद, हसू, हळवेपण, अजुन बरच काही तुमच्या चेहऱ्यावर उमटेल .......... अगदी बरोबर! तुमच्या मनातली सेलिब्रिटी........ तुमच्या मनातला नायक किंवा नायिका .....आठवणींच्या भुतकाळात रमताना , ही लोकं फक्त निखळ आनंदा पलीकडे आपल्याला कधीच दुसरं काही देत नाहीत.  धकाधकीच्या आजच्या काळात  मागे वळून  बघतांना  ते  क्षण अगदी सहज  आणि  अलगद  हे  मनातले  सेलिब्रिटी   देऊन  जातात , ते  आनंदाचे  क्षण कुठूनही  उसने घ्यावे  लागत नाहीत 

आपल्या  भोवतालची परिस्थिती, आपल्याआसपास असणारे लोक, यांचा आपल्यावर  नकळतपणे बराच परिणाम होत असतो. हे नायक किंवा नायिका म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेले आपले शेजारी , काका किंवा काकू,कधी शिक्षक,कधी दादा, ताई , मित्र किंवा मैत्रीण असे बरेचसे लोक . हे ते लोक असतात की ज्यांना बघून आपण फॅसीनेट झालेले असतो.  यांचा प्रभाव  आपल्या मनावर इतका असतो की ते आपल्यासाठी खरंच आपले सेलिब्रिटी असतात. आपल्याला लहानपणी सेलिब्रिटी म्हणजे काय कळत नसतं पण आपण जी व्यक्ती मनापासून एडमायर करतो, ती व्यक्तीआपल्यासाठी खरी 'रोल मॉडेल' असते, त्यांनी केलेली कुठलीही गोष्ट आपल्यासाठी तेवढीच बहुमूल्य. त्यांचा सहवास जास्तीत जास्त मिळावा ,त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी वेळ प्रसंगी आई बाबांचा ओरडा किंवा मार खाण्यातही एक वेगळी मजा होती. त्यांचं राहणं, त्यांचं बोलणं, त्यांनी केलेल्या गोष्टी ,त्यांची पर्सनॅलिटी, त्यांची लिविंग स्टाइल कितीतरी गोष्टी आपल्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी पुरेशा होत्या.

 अशीच एक सेलीब्रिटी माझ्या आयुष्यात आली आणि ती म्हणजे माझी शाळेतली मैत्रीण . तिला बघितलं की एखाद्या सेलिब्रिटी ला बघावं असं फिलींग यायचं.लहानपणी तिची प्रत्येक गोष्टीतली कर्तबगारी बघून मला ती सेलिब्रेटीच आहे असं कायम वाटत राहिलं आणि  तिचं दिसणही या गोष्टीला अधोरेखित करत राहीलं . तिची प्रत्येक क्षेत्रातली कामगिरी माझ्या या फिलिंग्जला कायम फॅसिनेट करत राहिली. लहानपणी मला शाळा फारशी आवडली नाही पण शाळेत जाण्यासाठीच हे फॅसीनेशन पुरेसं होतं.

वेळ जसा पुढे जातो तशी आपली ही सेलीब्रीटीची व्याख्या बदलत जाते. काळाच्या ओघात हेही समजायला लागतं कि जी सेलिब्रिटी आपण मनात जपलेली असते ती हळूहळू पुसटशी होत जाते. ज्या गोष्टी मनाच्या निरागसतेने टिपलेल्या असतात त्यातलं खरं वास्तव समोर यायला लागतं म्हणजे त्या गोष्टींचा पोकळपणा पुढे येतो असं नाही पण ती गोष्ट इतकीही मोठी नाही हे आपल्याला समजायला लागतं . पण माझ्यासाठी असं कधीच झालं नाही. माझ्या मनातली सेलिब्रिटी आजही तशीच आहे. तिच्यातले गुण आजही मला त्या गोष्टींची आठवण  करून देतात, मला पुन्हा एकदा त्या काळात घेऊन जातात.

आपल्या आयुष्यातली ही सेलिब्रिटी ती गोष्ट असते की काही काळासाठी आपल्याला आपलं आयुष्य जगायला लावते. आपल्या मनातल्या त्या क्षणांना अलगदपणे, हळुवारपणे आजही ताजतवानं करते. मनात जपलेल्या त्या असंख्य आठवणींनी  मनाला संवेदनशील करते.  .हि सेलिब्रिटी ती असते की जिच्या बरोबर आपण खरोखरच ते क्षण जगतो, तो अनुभव घेतो कि जो एखाद्या ऑनस्क्रीन सेलिब्रिटींबरोबर असण्याचा असतो. खरंतर हे ऑनस्क्रीन सेलिब्रिटी आपल्या आयुष्यात फार नंतर येतात, खरे सेलिब्रिटी तर हेच असतात ज्यांना आपण अनुभवलेलं असतं. हे ते लोक असतात की ज्यांच्या बरोबर आपला एक ऋणानुबंध असतो.माझ्या आयुष्यातली ही सेलिब्रिटी मला बरंच काही देऊन गेली, तुमच्या बाबतीतहीअसं काही झालय का?


#celebrity #childhood #Rolemodel #happiness #flashback

Comments

  1. वा खरंच लहानपण आठवलं आणि असेच काही भारावलेले प्रसंग सुंदर लिखाण खूपच ओघवती शैली आहे तुमची

    ReplyDelete
  2. खरंच खूप सुंदर, मनातली सेलिब्रिटी कुठे तरी लपलेली, जीवापाड जपलेली आणि नकळत हरवलेली.

    ReplyDelete
  3. True...,a movie went through my mind.

    ReplyDelete
  4. खरंच लहानपणी असे खूप रोल मॉडेल असतात काहींचे महत्व मोठेपणी समजते

    ReplyDelete

Post a Comment