गुलमोहर....नात्यातल्या मैत्रीचा


© अमृता कुलकर्णी 


पुर्वीपासूनच आपण गोतावळ्यात वाढलेलो ... आजी, आजोबा, काका, काकू, आत्या, मावशी ,मामा, लहान मोठी भावंडं... म्हणजे या सगळ्यांशिवाय आपलं  कुटुंब कधी पूर्णच झालं नाही आणि आजही होत नाही.  पूर्वीच्या काळी ,आजी -आजोबा हे कुटुंब प्रमुख तर  वडीलधारे काका, त्यानंतर येणारी  त्यांची भावंडं हि त्यांचा वारसा चालवणारी......

आजोबांची शिस्त, त्यांचे घरच्यांसाठी असलेले नियम, त्या नियमात वाढलेली त्यांची मुलं आणि अनुषंगाने त्याच गोष्टीचे लहान पोरा-बाळांवर झालेले संस्कार..असं एकंदर सगळं एकत्र कुटुंबाचं चित्र होतं. नोकरी-शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर पडलेले काका मग त्यांच्या नंतर  घरात मोठी झालेली बाकीची भावंडं..किंवा कधी कधी त्यांच्याच बरोबर बाहेर पडून त्याच्या संस्कारात मोठे झालेले आपले आई वडील.... पण जनरेशन नुसार हे  चित्र बदलत गेलंय. एका सुरात वागणारी आणि चालणारी माणसं  गरजेनुसार , वेळेनुसार  बदलत गेली. काही जण अर्थार्जनासाठी लवकर बाहेर पडले, तर काही जणांनी पूर्वीची एकत्र कुटुंबपद्धती स्वीकारून आपला संसार निगुतीने केला.पण या सगळया मध्ये आजी - आजोबांनी पेरलेल्या संस्कारक्षम पाळामुळांना  कुठेही तडा गेला नाही. एक वेगळं प्रेम , एक वेगळा विश्वास,  एक वेगळा आदर त्या एका पेढी मध्ये  होता.

कधी वेळेनुसार तर कधी राहणीमानानुसार त्या त्या वेळच्या पिढीमध्ये प्रचंड तफावत आली, आजची  generation ही completely वेगळी  आहे. पूर्वीप्रमाणे आज गोष्टी एकाधिकार पद्धतीपेक्षा समानतेवर जास्त  चालतात पण अर्थातच कुठेतरी त्या जुन्या पेरलेल्या संस्काराच्या पाळामुळांसकट.प्रत्येक गोष्ट खूप openly, clearly, हक्काने करणारी आणि नातीही जपणारी आजची पिढी आहे. नात्यांमध्ये एका formality  पेक्षा  मैत्रीचा एक वेगळा फील आहे. आजही काका, काकू, आत्या, मावशी ..ही सगळी नाती तीच आहेत पण त्यामध्ये एक वेगळीच मैत्री आहे.

  मैत्री ही नात्याचं सौंदर्य अधिकच खुलवते.. विविध रंगी बहर आणते.. चाफ्याच्या , रातराणीच्या  फुलांसारखा मनमोहक , सुगंध  मनामध्ये  कायमचा पसरावते.


नात्यांच्या मैत्रीत  लहान -मोठं,  दूर -लांब , गरीब - श्रीमंत हा भेदभाव कधीच नसतो. तुमचे विचार जुळले की तुमची मैत्री अजून पक्की होते.  यामध्ये कुठलाही मोठेपणाचा अधिकार येत नाही,  खूप निरपेक्ष पणा असतो.  एखादी जोडगोळी असावी तशी ही  नात्यातली मैत्री असते... अगदी सहज , अगदी सोप्पी,...  म्हणजे बघा  ना ........दोन काकां मधली मैत्री - त्यांचे हास्य विनोद  ..एकमेकांनी " तिच्या" वरून केलेली खेचाखेची .... एकमेकांचे वेंधळेपणाचे खास  किस्से share  करतांना, त्यांना आपण अनुभवलंय ... किंवा दोन जावा-जावां मधली नात्यापलीकडची जीवापाड मैत्री .... त्यांनी एकमेंसाठी केलेली खास खरेदी..  मनातले  शेअर केलेले काही हळवे क्षण..  एकेमेकींसाठी जपलेला नितांत आदर... नात्याची एक वेगळीच ओळख निर्माण करतो, मैत्रीचा एक नवीन पैलू समोर आणतो . दोन बहिणींची मैत्री किवा दोन  भावांमधली मैत्री किंवा दोन बहीण-भावांची मैत्री, हि लहानपणापासूनच असते. त्यांच्या बरोबर लहानपणी  खेळलेले खेळ,  केलेली भांडण, केलेली मस्ती, कधीच विस्मृतीत जात नाही. भावंडं कुठल्याही नात्यातली असुदे पण त्यांच्यातली मैत्री हि आयुष्यभर मनात असते.

आजकालचे आजी-आजोबा किंवा सासू-सासरे  हे या मैत्रीच नवीन प्रतिबिंब.. आजी - आजोबा हे नातवंडांचे  मित्र मैत्रीण तर  सासरा-जावई  यांच्यामधे वडील मुलाचा तर सासू-सूनेमध्ये आई मुलीच नातं..... तर कधी दोन  बहिणींचे नवरे  एकमेकांचे. बेस्ट friends..... तर कधी नणंद - भावजयीमधली निख्खळ मैत्री.  

नात्यातली मैत्री ही आयुष्यभराचा आधार असते आणि जगण्याचं एक  वेगळं समाधान  देते. हि मैत्री,  मागे वळून बघताना आपण काही गमावलंय हा feel  कधीच देत नाही. रुढी - परंपरांच्या मर्यादा मोडून , एका वेगळ्या वाटेवरची ही नात्यातली मैत्री असते. पण ही मैत्री जपताना फक्त आणि  फक्त प्रेमाचे बंध जपावे लागतात. एकमेकांची space समजून, एकमेकांचा respect करायचा असतो.....एकेमेंसाठीचा acceptance वाढवायचा असतो. भांडणांमधे काही गोष्टी  सोडून देवून सेलिब्रेशन साठी पुन्हा एकत्र यायचा असतं... इगो, मोठेपणाचा अधिकार, गैरसमज या गोष्टींपासून जाणीवपूर्वक लांब राहायचं असतं.वेळोवेळी नात्यातली हि मैत्री, ताजीतवानी ठेवण्यासाठी वर्षातून एक-दोनदा तरी एकत्र यायचं असतं आणि चढाओढीला तर बाहेरचा रस्ता दाखवायचा असतो.

आपल्याला एखादे मुल नाही ..... असेलच तर ते हुशार नाही किंवा आपल्याजवळ नसलेल्या पत, प्रतिष्ठा, आर्थिक कुवत यासारख्या तत्सम गोष्टींच्या दुःखात सलत बसण्यापेक्षा प्रेमाने दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःला झोकून द्यायचं असतं......   मायेने  त्या दुःख ला आयुष्यातून वजा करायचा असतं तेव्हा ही मैत्री गुलमोहरा  सारखी  बहरते. मैत्रीच्या या झाडाला असूया, इर्षा, घृणा नावाच्या रोगापासून  लांब  ठेवायचं असतं, त्याची वाढ होऊ द्यायची नसते.  अर्थातच हे सगळे प्रयत्न दोन्हीही  बाजूने करायचे असतात, तेव्हाच नात्याच्या मैत्रीचा बहर कायम स्वरुपी टिकतो.
   
मला कायम वाटत आलंय की हे कुटुंब  म्हणजे एक आनंदच झाड आहे..या झाडाला आधाराची, विश्वासाची, नात्याच्या परिपक्व तेची कायम गोड फळ लागलेली असतात. हे झाड या गोड फळांनी आणि सुंदर मनमोहक फुलांनी सतत डवरलेलं असतं. तुम्ही कुठलंही फळं किंवा फुल कधीही तोडा ...तुम्हाला कायम 'ती' गोडी देतील... मैत्रीचा 'तो' सुंदर सुवास देतील की आयुष्यभर आनंदरुपी हा सुवास प्रत्येकाच्या मनात दरवळत राहील ....

जगाच्या पाठीवर मी कुठेही असले, तरी हि मैत्री मी जपत आलीये आणि जपण्याचा प्रयत्न करतीये .......तुम्हीही ती जपताय ना ? 

#Friendship #Togetherness #Relationship #Happiness #Dildosti #Positivity

Comments

Post a Comment