ऋणानुबंध


© अमृता कुलकर्णी

खरंतर गेल्या कितीतरी दिवसांपासून कुठल्याही विषयावर लिहायचं सुचत नव्हतं, पण नुकत्याच बघण्यात आलेल्या एका  प्रसंगाने मला प्रकर्षाने जाणिव झाली की कदाचित या विषया इतका कुठला सुंदर विषय असू शकत नाही,  आपण यावर व्यक्त व्हायला हवं आणि माझे हात शेवटी लिखाणाकडे वळले. 

लहानपणापासून ते मोठं होईपर्यन्त आपण कुठल्या ना कुठल्या नात्यात कायम बांधलेले असतो.जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी या नात्यांमधून सुटका मात्र कधीच नसते. कधी जवळची तर कधी लांबची, ही नाती मात्र आपल्या आयुष्यात  कायम असतात आणि मला असं वाटतं की नात्या इतकी सुंदर गोष्ट असूच शकत नाही, कारण नाती आहेत म्हणूनच  आपल आयुष्य खूप बहारदार आहे. नात्यांशिवाय जरा आयुष्याची कल्पना करून बघा...ते कसं असेल याचा विचार सुद्धा आपण करु शकत नाही.  कदाचित माझ्या या गोष्टीशी बरेच जण सहमत असतीलच असे नाही, हे माझे वैयक्तिक विचार असु शकतात.... पण  मला असं वाटत आपला approach कसा आहे या वर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. 

कुठल्याही नात्याला जपण्यासाठी वेळ, आपुलकी आणि समंजसपणा या गोष्टींची नितांत गरज असते. या त्रयींशिवाय कुठलंही नातं कधीच परिपक्व होत नाही आणि यातल्या तीनही गोष्टींची किवा एकही गोष्टीची कमतरता हे नात्यातल्या दुराव्याचं किंवा  नात्याच्या कमकुवतपणाचं मूळ कारण असतं. 
आज काल आपण  नोकरी, घरातल्या priorities, या  सगळ्यांच्या नादात जरा काहीसे  बिझी आणि practical झालोय, वेळ  कमी पडतो हे अगदी खरंय.असं असलं तरीही ते नातं जपण्याचे आपले patience कमी पडतात हे मात्र नक्की. आपल्या अगोदरच्या generation सारखे एकमेकांचे deep connections आजकाल कोणीही जपत नाही. कामाच्या सबबी खाली आपण  बऱ्याचदा relationship casually घेतो. 'सब कुछ चलता है' च्या नावाखाली  आपण कळत नकळत पणे एकमेकांना  इतके गृहीत धरतो की  त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आपण गदा आणलिये हे आपल्या लक्षातच  येत नाही. मला असा वाटतं, की खरंच आपण दुसऱ्याचा विचार करतो का? त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य , तिचे  विचार, तिचं अस्तित्व मनापासून स्विकारतो का?  ......तर नाही आपण ते स्वीकारत नाही, किवा बऱ्याचदा आपल्या लक्षातही येत नाही. 

अपेक्षांची ओझी, स्वतःचे विचार एकमेकांवर लादण्याच्या नादात बऱ्याच वेळा आपण  खुप गुंग झालेलो असतो. work आणिlife चा बॅलन्स  करतांना आपल्या जवळचे आपल्याला समजू शकले नाहीत ही गोष्ट मनाला खात राहते. एकमेकांचे विचार समजून घेण्यासाठी, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत समजून घेण्यासाठी वयाची बऱ्याच वेळेला पन्नाशीही उलटून गेलेली असते. आणि हे सगळं ज्यावेळेस हळूहळू लक्षात यायला लागतं त्यावेळेस आपणच मनात कुठेतरी ओशाळतो, कुठेतरी स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतो की थोडीशी flexibility दाखवली असती तर कदाचित बरं झालं असतं. पण हे समजण्यासाठी वेळ मात्र निघून गेलेली असते आणि कदाचित ती व्यक्तीही .

मी  नात्याची तुलना आकाशातल्या चंद्राशी कायम करत आलीये.चंद्राचं सौदर्य जसं शांत, शीतल, मनमोहक असतं तसंच त्याच्या सौन्दर्यालाही ग्रहणही लागतं .असाच काहीसा प्रकार नात्यांचाअसतो.... प्रेमाने , आपुलकीने , समंजसपणाने ती जशी खुलतात तशी गैरसमज, अपेक्षांच्या ओझ्याने, इगोने त्यांना ग्रहणही लागतं. दुर्दैवाने नात्याच्या सौंदर्याचा अनुभव घेण्याऐवजी, नात्याला लागलेल्या ग्रहणाचा अनुभव आपण जास्त घेतो. त्यामुळे कुठेतरी नाती जपण्यापेक्षा, नाती नकोशी व्हायला लागतात.  त्यांचा त्रास , त्यांचं ओझं वाटायला लागतं. नुसतं इतकंच नाही तर पळवाटाही शोधल्या जातात. बऱ्याच वेळा लादलेली नाती, तयार झालेली नाती, जन्मभराची नातीही या ग्रहणाच्या विळख्यातून सुटत नाहीत.  शाळेच्या कवायतीत एकमेकांपासून काही अंतरावर उभी राहण्याची सवय आठवत असेलच........ते अंतर मानसिकरित्या नात्यांमध्ये पाळायला हरकत नाही असं मला वाटतं. 

आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही जोडीने येते किंवा प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू कायम असतात.चांगलं - वाईट, सुखं - दुःखं , positive - negative. या प्रत्येक बाबतीत आपण एकच बाजू कायम स्वरुपी कधीच मिळवू शकत नाही.म्हणजे चांगली बाजू बघतांना त्यामध्ये वाईट  बाजूचा प्रभाव पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते, त्यामध्ये समन्वय साधावा लागतो. हे करतांना सुरवातीला जड जातं पण अवघड तर नक्कीच नसतं. प्रयत्न पूर्वक ज्या वेळेस ही कलाकुसर आपल्या सवयीचा भाग बनते तेव्हांच नात्यांमधलं सौदर्य खुलतं आणि मग त्या कलाकुसरीत प्रेमाचे, आपलेपणाचे , माणुसकीचे, जिव्हाळ्याचे रंग भरता येतात. एकमेकांना स्वीकारता येतं. हि नाती म्हणजे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात, चांगलेपणा या नात्यांत आणण्यासाठी किंवा चांगल्या गुणांचे रंग नात्याच्या कलाकुसरीत भरण्यासाठी कधीकधी आपला कसही पणाला लागतो . शंभर टक्के ही गोष्ट यशस्वी होत नसली तरी नव्वद ते पंच्याण्णव टक्के नक्की होते आणि अर्थातच नातं टिकवण्यासाठी आपले प्रयत्न किती आहेत यावरही ही टक्केवारी  अवलंबून असते.
    

वेळेची कमतरता, रोजची धावपळ या सगळ्यामध्ये नाती जपणं हे अशक्यप्राय असलं तरीही चौकटीच्या बाहेर जाऊन प्रयत्न करायला काही हरकत नाही .आणि म्हणून उद्या, नातं गमावून कुठल्या तरी दुःखात आयुष्यभर कुढत बसण्यापेक्षा १०० टक्के नातं जपण्याचा प्रयत्न करून समाधानाने जगणं कधीही सुखकरच ... म्हणूनच प्रेमाची बेरीज , रागाची वजाबाकी, जिव्हाळ्याचा गुणाकार आणि इगोचा भागाकार जमला की आयुष्य  जगण्याचं  गणित नक्की उमगतं.

Comments

  1. Replies
    1. Your words always inspired me to write

      Delete
    2. Very well written. Your thoughts are very matured and approach towards life is positive. This helps to straighten the relationship..(Nati)

      Delete
  2. वाह वाह...शेवटून दुसरा आणि तिसरा परिच्छेद फार महत्वाचा आहे...

    ReplyDelete
  3. Supporter like you will always encourage me to write

    ReplyDelete
  4. Kharach Nati khup mahatvachi ahet...jyana he umagala tyancha ayushya kharya arthane samrudhha zala

    ReplyDelete
  5. मस्तच.... नेहमीप्रमाणे.... चंद्राचे उदाहरण.👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Post a Comment